Sunday, April 14, 2013

नागा प्रदेशात पाडव्याची गुडी

गुडी म्हणज्ये मराठी समाजाला  एक फारच मोठी देणगी …कारण तिचे सृजन करायला काहीच लागत  नाही - जे काही महालात मिळतं , तेच कुटीत हि मिळतं ! एक खण , एक कलश , आणि पुष्पवेल …! हवी फक्त कल्पना शक्ती …  गुडी म्हणज्ये जणु परकर पोलकं धातलेली एक खेळकर मुलगी …
 
यंदा, अर्थात इस्वी  २०१३ i.e. विक्रमी २०७० च्या पाडव्याला मी आणि मिसेस बहुधा घरा पासून दूर राहू, असा हिचा कयास होता आणि म्हणूनच ह्या सोबत एक तांब्या चा कलश, आणि एक  सिल्क चा खण बाळगून होत्या! आम्ही ढगांच्या राज्यात  कोहिमा ला आमच्या मित्रा च्या ठायी गुडी उभारली!  

गम्मत  म्हणज्ये आमच्या host  नीली ने गुडी च्या काठी  ची केलेली अफालतून सुव्यवस्था यानेकी जुगाड! खास गुडी करता अशी काठी मिळणे कठीणच होते. नीली अंगामी असल्या मुळे लगेच त्यांना आपले लिरी (Lerie) च्ये भाला बनवणारे तज्ञ आठवले........त्यांच्या कडे तरी नाहोर  वृक्षा च्या काठ्यांचा भांडार असणारच, असे म्हणून त्यांनी आपल्या लाडक्या बुलेट वर टांग टाकली, आणि आले मात्र भला मोठा ७ फुटाचा अंगामी भाला पेलवत , कारण दांडे नव्हते . भाल्याला असलेली मेंढरांच्या केसांची झालर  जणू काय गुडी करताच .  काय म्हणू इतकी सुरेख गुडी तय्यार झालीSSS- तुम्ही स्वतःच पहा ना!

भारताच्या cultural संगमाचा एक प्रतिक!
माझ्या कॅमरा च्या नजरेतून कोहिमा
 पहाटेचे चार वाजलेत


TETSEO  भगिनी -सुंदर गायिका!


इथे हॉर्नबिल फेस्टिवल डिसेंबर मध्ये होत असते